अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सुलेरजवळगे येथे महायुतीचे उमेदवार आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. भाजप-महायुतीला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन नागरिकांना केले. रामचंद्र अरवत यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह या वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला.
सुलेरजवळगे या गावात संत रोहिदास नगर येथे पेपर ब्लॉक बसवणे, गावांतर्गत सिमेंट रस्ता, श्री बिरंगेश्वर मंदिर, कमलेश्वर मंदिर, वल्ली साहेब दर्गा यांसमोर सभामंडप बांधकाम, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली 1 बांधकाम, नवीन अंगणवाडी क्र.128 बांधकाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधकाम, सांभार वस्ती येथे रस्ता खडीकरण, दलित वस्ती येथे समाज मंदिर बांधकाम, तडवळ ते सुलेर जवळगे रस्ता, सुलेरजवळगे ते पान मंगळूर- देवी कवठे रस्ता, सुलेरजवळगे ते केगाव- मुंढेवाडी रस्ता, सुलेर जवळगे- तडवळ- अंकलगे रस्ता, चिंचोळी ते सुलेरजवळगे रस्ता सुधारणा, सुलेरजवळगे मंगळूर ते देवी कवटे मध्ये रस्ता सुधारणा, कमलेश्वर मंदिर सुशोभीकरण, सुलेरजवळगे ते करजगी मध्ये रस्ता सुधारणा, जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा सोय अशी कामे झाली आहेत.
त्याचप्रमाणे शिलवंती मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम, धनगर समाज वस्ती येथे सभागृह बांधकाम, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, जिल्हा परिषद मराठी शाळा वर्ग खोली.1 बांधकाम अशा कामांना मंजुरी मिळालेली आहे. यावेळी परमेश्वर यादवड, सुरेश अर्जुन, लक्ष्मण वाघमारे, सुरेश गड्डी, अविनाश मडीखांबे, अण्णू याबाजी, सुरेश सद्दलगी, डॉ. हिप्पर्गी, अंबादास देवकते, नागू पाटील, रवी बगले, दयानंद उंबरजे, महादेव मुडवे, अजिज सुतार, विक्की ईश्वरकट्टी, अनिल पाटील, शिवलिंगप्पा अरवर, केंचप्पा पुजारी, गौडप्पा बिराजदार, शिवानंद मानशेट्टी, भाजप-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.