सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात प्रशासकीय इमारतीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन शनिवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते तर पालिका आयुक्त पि.शिवशंकर, विरोधीपक्षनेते अमोल शिंदे,परिवहन सभापती जय साळुंखे, गटनेते चेतन नरोटे,गटनेते रियाज खरादी,नगरसेविका श्रीदेवी फुलारी,नगरसेवक विनोद भोसले,नगरसेविका अनुराधा काटकर,नगरसेविका वैष्णवी करगुळे,उपायुक्त धनराज पांडे,नगर अभियंता संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध कामे सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन झाले असून लवकरात लवकर इमारत पूर्ण करण्याच्या हेतूने प्रशासनास आदेश देण्यात आले आहेत. या इमारतीमुळे नागरी सुविधा पुरवणे सोपे जाणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.वाढत्या शहराची व्यवस्था करण्याच्या हेतूने एकात्म आदेश नियंत्रण केंद्राची उभारणी करण्यात येत असून या केंद्राच्या माध्यमातून पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्था आदी नागरी सुविधांचा कंट्रोल रूम या ठिकाण पासून होणार आहे. यामुळे पालिकेला नागरी सुविधा पुरवणे प्रशासनाला सोपे जाणार आहे.अशी माहिती महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.