दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात राम नवमीनिमित्त श्रीराम मंदिराचे भूमिपूजन आणि उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. जय श्रीराम आणि जय हनुमान जय गजराने परिसर दुमदुमून गेला होता.गावातील श्रीराम प्रतिष्ठान ,जय हनुमान तरुण मंडळाच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन झाले. खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दिलीप सिध्दे, उदय पाटील, रामप्पा चिवडशेटृटी, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे, अण्णाराव बाराचारे, तुळजापूरचे सभापती पिंटू मुळे , सागर कत्ते ,भाजपचे तालुका चिटणीस सुनील कळके, माजी भाजप अध्यक्ष सिद्धाराम हेले आणि भाजप कार्यकर्ते मधुकर चिवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभुते म्हणाले, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निधीतून सुमारे १५ लाख रुपये खर्चून मंदिर परिसराला संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चून खोलीसुद्धा बांधण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्याच निधीतून सुमारे २५ लाख रुपये मंजूर झाले असून त्या माध्यमातून मंदिराच्या सभामंडपाचे सुशोभीकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनीसुद्धा भरघोस निधी देण्याचे अभिवचन दिले. उदयशंकर पाटील हे श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती देणार आहेत,असे केदारलिंग विभूते यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी बोरामणीचे सरपंच प्रकाश आवटे, उपसरपंच नरुद्दीन पठाण, रवी मस्के बोरामणी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भारत कवडे, व्हा. चेअरमन केशव धोत्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले