सोलापूर । दरवर्षी 14 एप्रिल दिवशी जगभरामध्ये भिम अनुयायी खूप मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करतात. परंतु परंतु यावर्षी जगभरामध्ये कोरोना महामारी चे संकट असल्यामुळे आपण यावर्षी जयंती साध्या पद्धतीने घरी साजरी करण्यात आली. घरातील सर्व लहान थोर उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उत्तर सोलापूर सरचिटणीस आयुष्यमान विठ्ठल वाघमारे यांच्या घरी साध्या पद्धतीने भीम जयंती साजरी करण्यात आली उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा डोनगाव अध्यक्ष विशाल भैय्या धाकतोडे तसेच सचिन वाघमारे उपस्थित होते