सोलापूर : अखिल भाविक वारकरी मंडळ यांचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ता.16-10-2022 रोजी सकाळी 10.00 वा. भव्य आणि दिव्य ” वारकरी मेळावा ” आयोजीत करण्यात आला आहे. ह. भ. प. भागवत महाराज चवरे पंढरपूर ( राष्ट्रिय उपाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली व खा. जयशिद्धेश्र्वर महास्वामी , विजयकुमार देशमुख , सुभाष बापू देशमुख , श्री. दत्तात्रय सुरवसे , अमोल बापू शिंदे , चेतन भाऊ नरोटे, भास्कर भांगे (प्रदेश उपाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाने निर्मलकुमार फडकुले सभागृह , श्री सिध्देश्वर मंदिर शेजारी, सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
" हेची आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम || " या संत उक्ती प्रमाणे
वारकरी संप्रदायाचा प्रचार- प्रसार करणेसाठी , संप्रदायाची वाढ करणेसाठी , अडी – अडचणी दूर करणेसाठी, गुणीजनांचा गौरव करणेसाठी, काळानुसार बदलत्या प्रवाहा बरोबर संत विचार घेऊन जाणेसाठी, ई. कार्य व संघटनात्मक पातळीवर विचार विनिमय व रचना करण्यात यावी यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्य विविध परंपरेने संस्कृतिक वारसा जपत आहे. तो वारसा पुढे टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत या हेतूने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करुन जिल्हा , तालुका, शहर सर्व कार्यकारिणी गठित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त महिला , पुरुष भाविक वारकरी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. ते पुढील प्रमाणे सर्वश्री बळीराम जांभळे , जोतिराम चांगभले , बंडोपंत कुलकर्णी, मोहन शेळके, संजय पवार , किसन कापसे, किरण श्रीचिप्पा , विष्णुपंत लिंबोळे, निवृत्ती मोरे , कुमार गायकवाड, अभिमन्यू डोंगरे महाराज, नागनाथ पाटील साहेब, हरिहर मोरे, सचिन गायकवाड, गोविंद लोंढे, दत्तात्रय सरवदे,नागनाथ शिंदे, गणेश वारे, महेश चोरमुले,दत्तात्रय भोसले आदी उपस्थित होते.