भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे व त्याच्या घटक संस्था यांना नुकतीच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ( नॅक) च्या समितीने भेट दिली. या समितीने भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय व त्याच्या घटक संस्था तसेच विविध विभाग यांचे सर्वेक्षण केले व आपला अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद(नॅक) यांच्याकडून भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयास मानाचा ‘A++’ दर्जा प्राप्त झाला आहे. भारतातील चार ते पाच टक्के विद्यापीठांना हा दर्जा प्राप्त आहे.
त्यात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा समावेश होतो. विद्यापीठ व त्याच्या घटक संस्था यांना नॅक कडून 3.60 सी.जी.पी.ए प्राप्त झाला आहे व त्याद्वारे सर्वोच्च असा ‘A++’ दर्जा बहाल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठाची स्थापना आदरणीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांनी 10 मे 1964 रोजी केली. समाजातील उपेक्षित तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा त्यामागचा मूळ उद्देश होता. स्थापने वेळीच आदरणीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांनी या संस्थेचे मी विश्वविद्यालयात रूपांतर करेन असे घटनेमध्ये नमूद केले होते. त्यांचे हे स्वप्न 26 एप्रिल 1996 रोजी पूर्णत्वास आले व भारती विद्यापीठास अभिमत विश्वविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला.
आपल्या साठ वर्षाच्या कार्यकाळात भारतीय विद्यापीठाने दर्जेदार शिक्षण देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. फक्त शहरी भागापुरते मर्यादित न राहता भारती विद्यापीठाचे जाळे हे ग्रामीण भागात ही सर्व दूर पसरले आहे जात ठाणे जिल्ह्यातील जवाहर सारख्या अतिदुर्गम व आदिवासी भागाचा ही समावेश होतो. कोणताही विद्यार्थी पैशामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब, भारती विद्यापीठ अभिमत विद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम साहेब, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम साहेब, यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना फी सवलत दिली जाते.
सोलापुरातील अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर ही भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची घटक संस्था असून इन्स्टिट्यूटलाही नॅक द्वारे ‘A++’ दर्जा प्राप्त झाला आहे. इन्स्टिट्यूटर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची समितीने दखल घेऊन इन्स्टिट्यूट चे कौतुक केले व काही सूचनाही दिल्या. इन्स्टिट्यूट तर्फे संचालक प्रा. डॉ. एस.बी. सावंत, नॅक कोऑर्डिनेटर डॉ. पी. पी. कोठारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, व्हिजिटिंग फॅकल्टी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी यांनी या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवला. सर्वांनी नॅक मूल्यांकन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून ‘A++’ दर्जा मिळवण्यासाठी योगदान दिल्याबद्दल इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी सर्वांचे आभार मानले व अभिनंदन केले.
या सर्व प्रक्रियेमध्ये भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम सर भारती विद्यापीठाचे कार्यवाह व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम साहेब, कुलगुरू डॉ. विवेक साउजी , रजिस्ट्रार जी. जयकुमार व विद्यापीठाचे नॅक कोऑर्डिनेटर डॉ. पोरे तसेच सर्व विभाग प्रमुख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.