येस न्युज मराठी नेटवर्क : श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी आढावा बैठकीसाठी मा. श्री तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री आले होते. त्यावेळी भाविक वारकरी मंडळ राष्ट्रिय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी भेट घेऊन 65 एकर संदर्भात चर्चा केली. वर्षभरात चार वारीला वारकरी भाविक 65 एकर मधील प्लॉट घेऊन तीन ते पाच दिवस नित्यनेम करणेसाठी मुक्कामी राहतात. पूर्वी नदी वाळवंटामध्ये रहात होते. परंतू स्वच्छतेचे कारण समोर करून सर्वांना 65 एकर मधील प्लॉट मध्ये राहणेसाठी ती जागा खुली केली आहे असे कोर्टात सांगण्यात आले आहे. पण 65 एकर मधील प्लॉट घेणे साठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला प्लॉट घेणेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भविकाना मंडप सापडणे कठीण होते. एका दिंडीला फक्त तीन दिवस तो प्लॉट अपेक्षीत आहे. तसेच प्रत्येक वारीला त्या प्लॉट वर वेगळी दिंडी असते. त्यामुळे त्या प्लॉटवर दिंडी प्रमुख हक्क दाखवण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. भाजी मंडईतील भाजी विक्रेत्याचा कट्टा असतो शासनाचा पण दररोज विक्रेता कायम स्वरुपी बसतो. त्याप्रमाणे 65 एकर मधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला निश्चित करण्यात येऊन नोंदणी अर्ज एकदाच घेऊन त्यांची कायम स्वरुपी नोंद करण्यात यावी. 65 एकर मधील प्लॉट संदर्भातील त्रास संपवून भाविकांना वारी कालावधी मध्ये नित्यनेम करणेसाठी सहकार्य करावे असे लेखी निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी मुख्यमंत्री यांचेकडे विषय मांडून लवकरात लवकर पूर्ण करु असे सांगितले . त्यावेळी शिवाजी सावंत उपस्थित होते.