महिला आणि पुरुष भजनी मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन..
सोलापुर -श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे मंगळवारी दिनाक ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता नवी पेठ येथील शिवस्मारक महापुरुष आणि महिला गटांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारक अध्यक्ष रंगनाथ बकापूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली
या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या भजन स्पर्धेमध्ये सहभागी भजनी मंडळात वादकासहित कमीत कमी आणि जास्तीत जास्त १२ सदस्य असणे आवश्यक आहे. भजनी मंडळाना स्पर्धेकरिता एक गौळण आणि दोन अभंग म्हणता येतील प्रत्येक भजनी मंडळासाठी पंधरा मिनिटाचा वेळ देण्यात येणार असून प्रत्येक मंडळांनी आपले वादन साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतुन पुरुष आणि महिला भजनी मंडळांना प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत.या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास ७००० रुपये द्वितीय विजेत्या संघास ५००० तृतीय विजेत्या संघात ३००० रुपये तर उत्तेजनार्थ १००० रुपयांचे बक्षीस तसेच उत्कृष्ट वादकास १००० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.सोबत प्रत्येक विजेत्या मंडळास सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र ही देण्यात येईल
स्पर्धेत सहभागी प्रत्येक मंडळास आणि सदस्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या भजनी मंडळांनी एक मार्चपर्यंत नाव नोंदणी करावी. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अधिकाधिक पुरुष आणि महिला भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर यांच्याशी शिवस्मारक कार्यालय गोल्डफिंचपेठ सोलापूर येथे किंवा ९८२२४९८३७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे सचिव गंगाधर गवसने या प्रसंगी केले. या पत्रकार परिषदेस शिवस्मारक चे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर , सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख धनंजय कुलकर्णी ,व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर उपस्थित होते.
भजन स्पर्धा नियम व अटी
१) प्रत्येक भजनी मंडळात वादकासाहित कमीत कमी जास्तीत जास्त १२ सदस्य आवश्यक
२) स्पर्धेमध्ये १ गौळण व २ अभंग म्हणता येईल. भैरवी वर्ज्य राहील.
३) प्रत्येक भजनी मंडळास १५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल.
४) प्रत्येक भजनी मंडळाने आपने वादन साहित्य सोबत आणावेत.
५) एका व्यक्तीला एकाच मंडळा मध्ये गायन करता येईल. अभंग व गौळण सांप्रदायिक असावेत.
६) प्रत्येक मंडळास व सदस्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
४) स्पर्धा शिवस्मारक सभागृह, गोल्ड फिंच पेठ, सोलापूर येथे होईल.
८) स्पर्धा मंगळवार दि ०४/०१/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु होईल
१) पुरुष व महिला भजनी मंडळास स्वतंत्र पारितोषिक दिले जाईल.
१०) मंडळानी वेळेपूर्वी ३० मिनिटे अगोदर सभागृहात उपस्थित राहावे
११) परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील
१२) भजनी मंडळाचा सहभाग नोंदणी शनिवार दि ०१/०३/२०२१ पर्यंत स्वीकारली जाईल.
पारितोषिके – प्रथम रु ७०००/- द्वितीय रु ५०००/- तृतीय रु ३०००/- उत्तेजनार्थ रु १०००/-
उत्कृष्ट वादक रु १०००/- स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र.
संपर्क: शिवस्मारक कार्यालय, गोल्ड फिंच पेठ, सोलापूर, मल्लिनाथ व्हटकर ०२१७-२७२९८१०, ९८२२४९८३५३.
वरील सर्व नियम व अटी आमच्या भजनी मंडळास मान्य आहेत. ते आमच्यावर बंधनकारक राहतील.