डॉ.दबडे परिवाराकडून हिंदु नव वर्षाची सोलापूरकरांना अनोखी भेट
सोलापूर :- हिंदु नव वर्षाची सुरूवात पवित्र विचाराने करावी याच हेतुने व्यासमुनीच्या सिध्दहस्त लेखणीतून साकार झालेले भागवत पुराण हभप चारूदत्त आफळे गुरूजी यांच्या ओजस्वी वाणीतून एैकण्याची संधी सोलापूरकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. 23 ते 29 मार्च दरम्यान हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात दररोज सायंकाळी 5 ते 8 वाजता भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. राजीव दबडे आणि डॉ. सौ. माधुरी दबडे यांनी दिली.
सोलापूरकरांसाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवून दबडे परिवाराकडून नेहमी सामाजिक बांधिलकी जपली जाते. त्याचाच भाग म्हणून यंदाच्या वर्षी हिंदु नव वर्ष साजरे करत असताना एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करता यावा नव्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत या हेतुने व्यासमुनींच्या सिध्दहस्त लेखणीतून साकार झालेले भागवत पुराणाचा भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भागवताचार्य हभप चारूदत्त आफळे गुरूजी यांच्या रसाळ आणि ओजस्वी वाणीतून भागवत पुराण एैकण्याची सुवर्णसंधी खास सोलापूरकरांठी करण्यात आलेली आहे. हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या या भारत देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. जगाच्या पाठीवर हिंदु परंपरा आणि संस्कृती आपल्या भारत देशात आहे. याचा अभ्यास आणि त्यातून चांगले संस्कार व्हावेत तसेच भागवत कथा एैकून नव्या वर्षाची सुरूवात नव्या पिढीने करावी आणि चांगले संस्कार त्यांच्यावर व्हावे असेही यावेळी सांगण्यात आले. दि. 23 ते 29 मार्च दररोज सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत चार हुतात्मा पुतळ्या समोरील हिने वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहामध्ये हा भागवत सप्ताह होणार आहे. सर्व सोलापूरकर नागरीक तरूण तरूणींनी या कार्यक्रमात सहभागी होवून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी कृष्णामाई नर्सिंग होमचे डॉ. राजीव दबडे, डॉ.सौ. माधुरी दबडे आणि दबडे परिवारातील सर्व सदस्यांनी केले.