उत्तर सोलापूर । ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यानिमित्त बीबीदारफळ येथे साध्वी सोनाली करपे यांचा श्रीमद््भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला आहे. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ज्योतीताई धनाडे यांचे कीर्तन होईल. २४ ते ३० नोव्हेंबर दररोज सायंकाळी ७ वाजता साध्वी दीदी राधाकृष्ण दर्शन, संत मीराबाई चरित्र, राजा परिक्षितांचा सुखदेव उपदेश, शिवसखी अाख्यान, कृष्णजन्म, रुक्मिणी स्वयंवर, कृष्ण सुदामा भेट, यावर दृश्य स्वरुपात कथा सांगतील. ३० नोव्हेंबर रोजी भारूडे होतील. १ डिसेंबर रोजी रात्री कीर्तनकेसरी अक्रुर महाराज साखरे यांचे कीर्तन होईल. सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक वसंत ननवरे, समाधान साठे, तुकाराम साठे, भारत साठे, दत्तात्रय देशमुख, शैलेश साठे, चंद्रकांत साठे, मल्हार कानवले, ब्रम्हदेव ननवरे, रामेश्वर शेंडगे व बीबीदारफळ ग्रामस्थांनी केले आहे.