16 फेब्रुवारी च्या देशव्यापी औद्योगिक बंद मध्ये सोलापुरातील हजारो कामगार कर्मचारी सामील होतील.
सोलापूर दिनांक – तब्बल 14 वर्ष सोलापुरातील 30 हजार असंघटीत कामगारांनी अहोरात्र संघर्ष करून रे नगर हे महत्त्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प साकारले. या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या लाभार्थ्यांच्या हाताला रोजगार, सर्वांना मोफत सौरऊर्जा व वाढीव अनुदानाची गरज आहे.रे नगर उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर च्या जनतेला लष्करी जवानांचे गणवेश शिवून देण्याची निविदा जारी करण्याची गॅरंटी दिली होती ती आजमितीस पूर्ण झाली नाही. येत्या 16 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन बंद हाक दिली असून त्यात हजारोंच्या संख्येने सहभागी होतील आणि जनता विरोधी धोरणे राबणाऱ्या मोदी सरकारला आगामी काळात पायउतार करायला भाग पाडतील.असा दावा माकप चे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केला.

बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सिटू च्या वतीने लढाऊ रेडिमेड शिलाई व यंत्रमाग कामगारांचा मेळावा पार पडला.
पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की,
केंद्रातील मोदी सरकारने कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे आणून खाजगी भांडवलदार आणि धनिकांच्या हिताला अग्रक्रम देत आहे. कामगारांनी अनेक वर्षे लढा करुन मिळविलेले ४४ कायद्यापैकी महत्वाचे २९ कायदे मोडीत काढून ४ श्रमसंहिता मंजूर केले आहेत. यामुळे कामगारांचे कामाच्या ठिकाणी असणारे सर्व मुलभूत अधिकार संपुष्टात येणार आहेत. मात्र बड्या भांडवलदारांची मोठी धकबाकी माफ केली आहे तर असूनही त्यांना सवलती देण्यांत येतात.

प्रत्येक व्यक्तीस अंगावरील वस्त्राशिवाय राहणे अशक्य असताना जे कुशल, शिवण काम करणाऱ्या असंख्य कामगारांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळत नाही, वर्षातुन फक्त चार ते सहा महिने काम या कामगारांना मिळत आहे. किफायत ट्रामध्ये वस्त्र तयार करुन मिळत असतांना कामगारांना मात्र योग्य तो मोबदला मिळत नाही. मोठ-मोठे भांडवलदार उद्योगपती मात्र बसल्याठिकाणी या कामगारांच्या मेहनतीवर करोडो रुपयाचा मलीदा (नफा) मिळवून किमान वेतन, हजेरी कार्ड, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन व विमा सारखा हक्क नाकारतात व तुटपुंज्या व अपुऱ्या उत्पन्नावर त्यांना आपले जीवन जगावे लागते. या सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा व त्यांच्या हक्काचे कल्याणकारी महामंडळ स्थापनेसाठी, कायमस्वरुपी काम व त्यांच्या हक्काचे घर मिळविण्यासाठी श्रमिकांच्या अथक प्रयत्नातुन जगात कोठेही रेडिमेड व शिलाई कामगारांचा गृहप्रकल्प नाही. ते फक्त आपल्या सोलापूरातील रेडिमेड व शिलाई कामगारांसाठी गृहप्रकल्प राबविण्यात आला आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रेडिमेड व असंघटीत कामगारांना मा. पंतप्रधान यांच्या हस्ते दि. १९ जानेवारी २०२४ रोजी घरकुलांचे हस्तांतरण झाले. केंद्र सरकारच्या या योजनेत पूर्वी राजीव आवास योजना असताना पायाभूत सुविधांसाठी रु. ४ लाख ५० हजाराची सबसीडी होती. नरेंद्र मोदी सरकारने त्यात कपात करुन फक्त २ लाख ५० हजाराची सबसीडी केली आहे. यामुळे प्रत्येक सभासदावर २ लाखाचा अतिरिक्त बोजा पडल्याने तेवढे कर्ज त्यांच्या अंगावर आले आहे. याशिवाय या योजनेत सौर उर्जा सुरु केल्यास त्यांच्या वीज बिलातही कपात होणार आहे. या मागण्या करुनही पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणांत एका शब्दानेही याचा उल्लेख केला नाही.
यावेळी सिटू चे राज्य महासचिव ॲड एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, यावेळी सिटू चे राज्य महासचिव ॲड एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की
१) रेडिमेड व शिलाई कामगारांच्या घरकुलाकरिता वाढीव सबसिडी २ लाख द्या.
२) रेशन व्यवस्था मजबूत करा, प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य द्या.
३) महागाई कमी करा, बेरोजगारांना बेकार भत्ता द्या.
४) लॉकडाऊन काळासाठी केंद्र सरकारने दरमहा सहा महिनेसाठी रु. ७५००/- प्रमाणे व
५) शिलाई कामगारांना सामाजिक सुरक्षेसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करुन प्रॉव्हिडंड फंडासह सर्व कायदे लागू करा.
६) १२ महिने काम मिळण्यासाठी शासकीय रेडिमेड प्रकल्पद्वारे रेडिमेड घरकुल योजनेमध्ये कामगारांना काम मिळावे.
) सर्व शिलाई व रेडिमेड कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करा
७ ८) रेडिमेड शिलाई कामगारांना दरमहा रु. २६ हजार किमान वेतन द्या.
९) सार्वजनिक उद्योगधंद्याचे खाजगीकरण बंद करा.
१०) मालकधार्जीणे कामगार संहीता रब करा.
११) असंघटीत व शिलाई कामगारांना दरमहा रु. 10,000 पेन्शन द्या. वाढीव अनुदान द्या. १२) केंद्राची ४० टक्के सबसीडीसह राज्य सरकारने ६० टक्के अनुदान देऊन सौरऊर्जा प्रत्येक घरावर बसवा.
या जनतेच्या मागण्या घेऊन 16 फेब्रुवारी देशव्यापी औद्योगिक बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
यावेळी सिटू चे राज्य महासचिव ऍड.एम.एच.शेख, रे नगर फेडरेशन चे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, रे नगर फेडरेशन चे सचिव युसुफ शेख मेजर आदींनी मनोगत व्यक्त केले.
रंगप्पा मरेड्डी, बापू साबळे,किशोर मेहता,लक्ष्मण माळी, ॲड.अनिल वासम, गजेंद्र दंडी,अशोक बल्ला,संदीप रेऊरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी दीपक निकंबे,बाळकृष्ण मल्याळ, अभिजित निकंबे,अकील शेख, आसिफ पठाण इलियास सिद्दीकी,नागेश म्हेत्रे, शिवा श्रीराम, अंबादास बिंगि,अंबादास गाडगी,सिद्राम गडगी ,विजय हरसूरे, प्रकाश कुरहाडकर, अंबाजी दोंतुल, गोपाळ जकलेर, प्रवीण आडम, अनिल घोडके, श्रीनिवास तंगडगी आदीसह सर्व पूर्णवेळ कार्यकर्ते परिश्रम घेतले.