सोलापूर : बुधवार पेठेतील पठाण चाळ येथे घरासमोर बांधकाम करण्याच्या कारणावरून मुरारजी पेठ येथील अभिषेक नगरमध्ये राहणाऱ्या अजय बाळासाहेब वेळेकर याने श्याम मारुती सलगर आणि त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. श्याम सलगर यांच्या पत्नीस आरोपीने, ‘ही बाई लई मध्ये मध्ये करते तिला जिवंत सोडत नाही ‘ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बर्डे अधिक तपास करीत आहेत.