सोलापूर : सम्राट चौकातील आंबेडकर नगर येथील प्रकाश रोहिदास साळवे यांनी घरासमोर खेळणाऱ्या मुलांना येथे बॅटबॉल खेळू नका, असे सांगितल्यानंतर साळवे यांच्या शेजारी राहणाऱ्या विक्की चांगदेव शेंडगे, प्रताप चांगदेव शेंडगे , सुजित प्रताप शेंडगे, आदर्श शेंडगे या चौघांनी आमची मुले येथेच खेळणार , असे सांगून शिवीगाळ केली. त्यानंतर ढकलाढकली होऊन विकी शेंडगे याने घरात जाऊन लोखंडी रॉड आणला व त्या रोडने प्रकाश साळवे यांना मारहाण केल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कटके अधिक तपास करीत आहेत