सोलापूर : शहर जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना चे रुग्ण वाढू लागले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत यापुढे कोरोना बाबत कडक कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजपासून तुम्ही विना मास्क फिराल तर पाचशे रुपये दंड होणार आहे तसेच कोरोना सर्व निर्बंध पाळूनच कार्यक्रम करावे. लग्न मंडपात देखील विना मास्क लग्न झाले तर त्या मंगल कार्यालयाच्या मालकावर कारवाई केली जाणार आहे. तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर फास्ट विना टोलनाका पास करत असाल तर तुम्हाला दुप्पट टोल देखील भरावा लागणार आहे शिवाय महामार्गावर तुमची गाडी 80 किलोमीटर प्रतितास वेगापेक्षा अधिक वेगाने धावत असेल तर तुम्हाला तब्बल दोन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो त्यामुळे सोलापूरकरांनो या सर्व बाबींचा विचार करून सर्व नियम पाळा असेच येस न्यूज मराठीचे आवाहन…