सोलापूर : येथील सेंट जोसेफ हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले जेसा या संघटने द्वारे शाळेतील माजी विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल टूर्नामेंटच्या आयोजन शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले. फायनल मॅच वुल्फ पॅक आणि बझुका एफ सी मध्ये झाले आणि बझुका एफ सी २-० ने अंतिम सामना जिंकला.
दोन्ही संघाला ला रोख बक्षीस + ट्रॉफी देण्यात आले. उत्कृष्ट गोलकिपर ऋषिकेश शेळके , उत्कृष्ट डिफेंडर हरीश घाडगी ,उत्कृष्ट मिडफिल्डर तर्पण तिकडे, उत्कृष्ट स्ट्रायकर कमरान शेख, सर्वात जास्त गोल आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आभिद शेख. बक्षीस वितरण कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य आनंद गायकवाड, जेसा संघटनेचे अध्यक्ष विल्फ्रेड फर्नांडिस, सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, भागवत असोसिएट्स चे प्रतीक मनोज भागवत, इन सिग्निया आर सिनेमास मिनीप्लेक्स रोहित जाधव, देवदत्त पटवर्धन, झुबिन अमरिया, सिध्दाराम चाकोते, गिरीश स्वामी, संदीप जव्हेरी, गौरीशंकर म्हमाणे, सौ.फरहनज कलबुर्गी, उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष राजेंद्र बुमरा,सचिव शकील कादरी, खजिनदार जोना मोंटलग्री, वैभव जाधव, ॲड.अमीर बागवान, सनी भोसले व रियान देशमुख यांनी परिश्रम घेतले. समोलोचन जॉन रोमन तर कार्यक्रमच्या सूत्रसंचालन रोमा पटणे व आभार अक्षय जव्हेरी यांनी केले.

