उपक्रमशील शाळा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही होणार गौरव…
सोलापूर – शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा येथील बसवेश्वर विचार मंचचा आदर्श शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी जाहीर केले.
पुरस्कार वितरण समारंभाचे यंदाचे हे 31 वे वर्षे आहे .शुक्रवार दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. बलिदान चौक येथील जैन स्थानकात हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.आमदार विजयकुमार देशमुख यांचे हस्ते दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत वानकर, सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू,सहस्त्रार्जुन शिक्षण संस्थेचे चेअरमन राजू भुमकर,जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पदम राका आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे:महादेव वांगीकर(पर्यवेक्षक एस.व्ही. सी एस प्रशाला भवानी पेठ), दशरथ गुरव(ज.रा चंडक प्रशाला बाळे), ज्योती मनीष बांगर(श्राविका प्रशाला), डॉ.मनीषा पाटणे( छत्रपती शिवाजी प्रशाला), प्राचार्य अंबादास पांढरे(स्वामी विवेकानंद प्रशाला आणि महाविद्यालय), जय कबाडे(सहस्त्रार्जुन प्रशाला), रिजवान शेख (बालभारती विद्यालय), चेतन महाजन(दयानंद मॉडेल स्कूल), अण्णाराया तुप्पद(मल्लिकार्जुन प्रशाला हत्तुरे वस्ती), विनोद सावंत(दयानंद काशिनाथ आसावा प्रशाला), भाग्यश्री करकमकर(एस. व्ही. सी.एस. प्रशाला एमआयडीसी), रेणुका राजे (यलगुलवार प्रशाला), संजीवनी तगवाले(सेंट जोसेफ प्रशाला), कावेरी द्यावरकोंडा(श्री बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल), संतोष साळुंके(जिल्हा परिषद शाळा मार्डी),शिक्षकेतर कर्मचारी: सुनीलकुमार चलवादी (प्रबंधक डीएव्ही वेलणकर वाणिज्य महाविद्यालय सोलापूर), रमेश रायचूरकर (लिपिक -रामदास यल्लप्पा माणेकरी हायस्कूल)उपक्रमशील शाळा: नुमवि मराठी शाळा सोलापूर, धर्मण्णा सादूल प्रशाला नीलम नगर, गैबीपीर उर्दू प्रा. स्कूल
फेटा,शाल,श्रीफळ, माळ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी केले आहे.