सोलापूर – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बार्शीतील एका मराठा बांधवाने बार्शी ते दिल्ली सायकल यात्रेला सुरुवात केली आहे.बंडू लोकरे असं या तरुणाचे नाव आहे.मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्लीपर्यंत संघर्ष यात्रा सुरू केली आहे.बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेची सुरुवात केलीय.
या सायकलवर दोन्ही बाजूने मराठा आरक्षणाचे बोर्ड लावण्यात आले आहेत.गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे.ते दिल्लीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहेत. मराठा बांधवांकडून बंडू लोकरे याचे जोरदार स्वागत करून बार्शी ते दिल्लीपर्यंत त्याच्या प्रवाशाला शुभेच्छा दिल्या आहेत.बार्शी ते दिल्ली हा साधारण सोळाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून लोकरे करणार आहेत. त्यासाठी त्यांना 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागणार आहे.