सोलापूर : काही पक्षाचे लोक शहरात मोर्चे काढून, वादग्रस्त वक्तव्ये करून शहराचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या नेत्यांना शहरात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केली.लोकसभा पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या एम आयएमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी झाला. यावेळी ते बोलत होते.
शाब्दी म्हणाले, मोईन सय्यद यांनी २०१२ मध्ये एमआयएम पक्ष सोलापुरात आणला. सय्यद यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता काम केले.विधानसभा निवडणुकीत मला ३८ हजार मते मिळाली. हे मतदान पक्षाच्या जोरावर झालेले आहे. पक्षातील नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून आम्ही काम करणार आहोत. निवडणुकीत हुल्लडबाजी चालत नाही. केवळ गर्दी करून, गाड्यांचे हॉर्न वाजवून, शेर आया, शेर आया अशा घोषणा देऊन उमेदवार विजयी होणार नाहीत. कार्यकर्त्यांनी बूथ बांधणीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन शाब्दी यांनी केले.
यावेळी जिल्हा निरीक्षक अन्वरसादात, कोमारो सय्यद, फारुख एम आर, शोहेब चौधरी, राजा बागवान, याकुब शेख, नईम शेख शोहेब चौधरी, सचिन कोलते, वसिम शेख, नसिमा कुरेशी, अनिसा डोका, मच्छिंद्र लोकेकर, मोईन पटवेगार, रिझवान कुरेशी, अमन दर्जी, फिरोज के के, कादर भागनगरी, अल्ताफ शेख, अनफाल शेख, आरीफ कुरेशी, जुबेर बगवाले आदी उपस्थित होते.