दिनांक ११ जून २०२५ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर भुईंजे गावाजवळ मुंबई येथून शेडम येथे जात असताना एका सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर क्रमांक MH 12 RN 8634 ला एका दुचाकी क्रमांक MH 11 BJ 5525 ने पाठीमागुण जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे पती पत्नी गंभिर जखमी झाले असून सदर जखमी व्यक्तींना स्थानिक लोकांनी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना दिली असल्याची माहिती सावळेश्वर टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे.
