कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे. या प्रचारात काँग्रेसने घोषणापत्र जारी केले आहे. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली आहे. कर्नाटकात सरकार आले तर त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसच्या याच जाहीरनाम्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी बुधवारी आपल्या रॅलीची सुरुवात जय बजरंग बलीच्या घोषणांनी केली. त्यानंतर आता आज भाजप कर्नाटकात ठिकठिकाणी हनुमान चालीसा पाठ करणार आहे.