येस न्युज मराठी नेटवर्क : बहुजन समाज पार्टी सोलापूर तर्फे अप्पासाहेब लोकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण मिळावे या बाबत निवेदन देण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 7 मे च्या आदेशाने एकतर्फी निर्णय घेऊन महाराष्ट्रातील sc/st यांचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेऊन, घटनाबाह्य निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय चुकीचा असून रद्द करण्यात यावा आणी मागासवर्गीयांच्या पदोन्नीती कोट्यातील 33% रिक्त पदे बिंदू निमवली नुसार तात्काळ भरण्याचे आदेश देण्यात यावेत कारण हजारो sc/st कर्मचाऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होईल. तसे न केल्यास मागासवर्गीयांना न्याय न मिळाल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र अंदोलन करेल असा इशारा यावेळी संघटनेकडून देण्यात आला.
यावेळी राज्य सचिव अप्पासाहेब लोकरे, जिल्हा झोन प्रभारी बलभीम कांबळे, जिल्हा कार्यालय सचिव शिलवंत काळे, शहर अध्यक्ष देवा उघडे, जिल्हा सचिव योगेश गायकवाड, अमर साळवे, राहुल सर्वगोड , सचिन इंगळे, भुषण गायकवाड , नागनाथ गायकवाड , अॅड. संघरक्षित उडानशिव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.