सोलापूर महानगरपालिका अंतर्गत स्वामी विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेवाडी (झोन 5) येथे माननीय अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिमेअंतर्गत जनजागृती अभियान हा कार्यक्रम घेण्यात आला याबाबत स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत काही सूचना करण्यात आले तसेच पर्यावरण बाबत जनजागृती करण्यात आली..
या मोहिमेचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे भविष्यात स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर नक्कीच दिसेल या कार्यशाळेत मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सुदर्शन भोसले, मिरा गायकवाड, रेवती कडगंची, ज्योती राऊत उपस्थित होते.