येस न्युज मराठी नेटवर्क : संगमेश्वर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक महमदमुस्तफा मकानदार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर वतीने विद्यावाच्यस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रा मकानदार यांनी “ऍन एक्सप्लोरेशन ऑफ मिसीजीनेशन इन पीटर अब्राहम, डॅन जॅकबसन, विल्यम प्लोमर अँड सारा मिलिंस सेलेक्टेड नॉवेल्स” या विषयावर अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ हणूमंत आवताडे यांच्या मार्गदर्शनाखालीे संशोधन केला आहे.
प्रा मकानदार हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ गावचे रहिवासी असून शेतकरी इब्राहिम मकानदार यांचे पुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संगमेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज काडादी, प्राचार्य डॉ शोभा राजमान्य, इंग्रजी विभागप्रमुख प्रा धानप्पा मेत्री, प्रा अर्जुन धोत्रे, डॉ नंदा साठे, डॉ उषा जमादार, प्रा नागराज खराडे, प्रा इमाम स्वार, डॉ अब्बासअली मकानदार, इलाही मकानदार आदिंनी अभिनंदन केले