विश्व शांती केंद्र (MIT) संस्था पुणे, भारत आयोजीत विज्ञान,अध्यात्म आणि तत्वज्ञानाची जागतिक परिषद त्यामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ.राहुल कराड यांच्या तर्फे पंढरपूर येथील श्रीगुरु आंबेकर उर्फ आजरेकर फडाचे विद्यमान मालक ह भ प भागवत महाराज चवरे यांना ” समर्पित जीवन गौरव पुरस्कार ” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.