येस न्युज मराठी नेटवर्क : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित , सौ भू म पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात ब्रतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापुरे , महापौर श्रीकांचना यन्नम , विद्या गोप , विद्या कुंभार , ज्योत्स्ना रणदिवे, मुख्याध्यापिका गीता सादुल , पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांच्या हस्ते आठ फूट उंच भव्य ब्रतुकम्माचे पूजन करण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी 60 किलो फुलांनी या ब्रतुकम्माची रचना करण्यात आली. पारंपरिक तेलुगू लोकगीतावर 2000 विद्यार्थिनींनी फेर धरून ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो अशी आराधना भवानी मातेस केली . पारंपरिक वेशभूषा परिधान करून नटून थटून आलेल्या मुलींनी दोन वर्षानंतर या उत्सवाचा आनंद लुटला .
भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ असून विविध राज्यातून नवरात्रीच्या काळात देवीचा जागर केला जातो. तेलुगू संस्कृतीत ब्रतुकम्माचे खूप महत्त्व आहे. ही संस्कृती जपली जाते ही अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले. मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी महान अशा संस्कृतीचे संक्रमण पुढच्या पिढीत व्हावे या उद्देशाने दरवर्षी ब्रतुकम्मा उत्सवाचे आयोजन केला जातो अशी माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना संगीता इंदापुरे यांनी ब्रतुकम्मा उत्सवातून मुली वाचवा हा संदेश देऊन त्यातून मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो याची कहाणी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी दोन दिवसांपासून उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. उमा कोटा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रणिता सामल यांनी आभार मानले.