उपाध्यक्षपदी मोरे, माने यांची बिनविरोध निवड
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथील मंगल कार्यालयात सोलापूर जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा होऊन संघटनेच्या अध्यक्षपदी पाणीपुरवठा विभागातील प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष अनिल जगताप, सचिव नागेश पाटील, महासंघाचे राजेश देशपांडे, सुहास चेळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुकानिहाय पदाधिकारी, सदस्यानी उपस्थित केलेल्या शंका, अडीअडचणी, नवीन संकल्पना,यावर सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर नूतन कार्यकारणीस मान्यता देण्याबाबत तसेच लिपीकांच्या अडीअडचणी, वेतन त्रुटी, परीचर पदे भरण्याबाबत,सुधारीत आकृतीबंध, संच मान्यता, जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबतच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.याप्रसंगी जिल्हा आदर्श लिपीक पुरस्कार, लिपीकांच्या पाल्यानी विविध क्षेत्रामध्ये मिळवलेले यश अशा सर्वांचा सन्मान करण्यात करण्याचा मानस करण्यात आला. सभेचे नियोजन पंढरपुर लिपीकवर्गीय संघटेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्यरीतीने केल्याबद्दल सोलापुर जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने पंढरपूरचे अध्यक्ष प्रल्हाद मोरे व सचिव माऊली सांळुंखे, माजी अध्यक्ष संतोष मोरे, दत्तात्रय लवटे यांचे विषेश अभिनंदन करण्यात आले.
आणि टाळ्यांचा गजर…
इच्छुकांचा अंदाज घेऊन संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून अविनाश गोडसे यांचे नाव जाहीर करताच उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून व हात उंचाऊन एकमताने मान्यता दिली. त्यानंतर गोडसे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच जिल्हा उपाध्यपदी संतोष मोरे व दिपक माने यांचीदेखील बिनविरोध निवड टाळ्यांच्या गजरात करण्यात आली.तसेच कार्याध्यक्षपदी नितीन पाटील,दत्तात्रय लवटे,महेश शेंडे,बसवराज दिंडोरे,सचिवपदी नागेश पाटील,सहसचिव दिनेश काळे,सचिन मायनाळ,कोषाध्यक्ष विजय रणदिवे,सहकोषाध्यक्ष सचिन घोडके,जिल्हा संघटकपदी रविकिरण कदम या कार्यकारणीची निवड उपस्थितांच्या समोर पार पडली. सोलापूर जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संघटनेचे अध्यक्ष, विविध पदाधिकारी, तसेच महिला पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. नूतन अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले.