पंढरपूर – विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेचा गाभारा सभामंडप व संपूर्ण मंदिरामध्ये तसेच नामदेव पायरी येथे वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुले असणार्या सुंदर व आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे.तसेच सभामडप येथे श्री विठ्ठलाच्या देखाव्याची रांगोळी देखील काढण्यात आली आहे.त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर रंगीबेरंगी फुले आणि रांगोळी यांनी सजावट केल्याने श्री विठ्ठल मंदिर आकर्षक दिसत होते.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंदिर सॅनेटाझेशन करण्यात आले.