येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना च्या साथीमुळे अख्खे जग बंद पडले. पंढरपूरच्या आषाढी वारी सह देशभरातील खूप मोठ्या यात्रा-जत्रा रद्द झाल्या .असे असताना सोलापूरच्या राज्यकर्त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू करत सिद्धेश्वर यात्रेच्या आडून राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आमदार प्रणिती शिंदे ,आमदार संजय शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख या प्रमुख राजकीय मंडळी सह काही जणांनी यात्रा झालीच पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांचे दरवाजे ठोठावले आहेत यात्रा होणार नाही शासन इतर देवस्थाना प्रमाणे सिद्धेश्वर च्या देवस्थानाला देखील यात्रे बाबत नियमावली घालून देणार हे माहीत असताना देखिल राजकीय मंडळी सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहेत मात्र दुसरीकडे गेल्या सहा वर्षापासून सोलापूरच्या विमान सेवेला अडथळा ठरणारी आणि महापालिकेपासून न्यायालयापर्यंत सर्वांनी बेकायदेशीर ठरवलेली चिमणी पाडकामाबाबत ही राजकीय मंडळी ब्र शब्ददेखील काढत नाहीत. त्यामुळे सोलापूरकरांना तुम्हीच ठरवा तुम्हाला सिद्धेश्वर यात्रेतील गर्दी हवी आहे की सोलापूरच्या उद्योगजगताला भरारीचे पंख देण्यासाठी विमानसेवा हवी आहे