सोलापूर : ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी निष्काळजीपणा करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष शहरव जिल्ह्याच्या वतीने सोलापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यंनम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील, झेडपी सदस्य अरुण तोडकर, आनंद तानवडे, बिज्जू प्रधाने, अमर पुदाले, शंकर वाघमारे, के के पाटील, शशिकांत चव्हाण,प्रणव परिचारक, यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी होते यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी चेतावणीखोर भाषण देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळा अशा सूचना भाषणात केल्यानंतर त्वरित कार्यकर्त्यांनी लपवलेले पुतळे बाहेर पळून जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा अलर्ट असलेल्या पोलिसांनी पुतळे जाळले अगोदरच ते हिसकावून घेतले आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले