बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर यांच्यावर म्युझिक कॉन्सर्टदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. कैलाश यांच्यावर कर्नाटकातील एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान हल्ला झाला आहे. दरम्यान, आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कैलाश खेर यांची 29 जानेवारीला कर्नाटकात एक म्यूझिक कॉन्सर्ट होती. दरम्यान म्यूझिक कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या मंडळींपैकी एका व्यक्तीने कैलाश खेर यांच्यावर बाटली फेकून हल्ला केला. अद्याप गायकाला किती दुखापत झाली आहे हे अजून समोर आलेलं नाही.
नेमकं प्रकरण काय?
हंमी महोत्सावाच्या निमित्ताने कर्नाटकात कैशाश खेर यांच्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान उपस्थित असलेल्या मंडळींनी कैलाश यांच्याकडे कन्नड गाण्यांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खूप गोंधळ झाला आणि जमाव अनियंत्रित झाला. दरम्यान उपस्थित असलेल्यांपैकी एका व्यक्तीने कैलाश खेर यांच्यावर बाटल्या फेकून मारल्या. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असेल्या पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.
कर्नाटकातील हंपी फेस्टिव्हलबद्दल जाणून घ्या…
कर्नाटकात 27 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत हंपी फेस्टिव्हलचे (Hampi Festival) आयोजन करण्यात आले आहे. यात सिनेजगतातील अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. 29 जानेवारी 2023 रोजी कैलाश खेर यांनी या महोत्सवात आपली कला सादर केली आहे.
कैलाशा यांनी हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, उडिया आणि उर्दू या भाषांमधील एकूण 700 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांना फिल्मफेअरच्या ‘बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर’ या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे.