सोलापूर : विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक दीपक मल्लिनाथ उपासे हे सरकारी काम करीत असताना अडथळा आणल्याने गुरुदेव दत्त नगर येथील सीमा कल्याण शेट्टी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक उपासे यांच्याकडे शोभा बिराजदार ही अर्जदार महिला चौकशीसाठी आली असताना सीमा कल्याणशेट्टी यांनी त्यांचे केस पकडून मारहाण केली . तसेच पोलीस नाईक दीपक उपासे यांना ढकलून देऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विवाहात मानपान न झाल्याने सासरच्या मंडळींकडून छळ
सोलापूर : होटगी रस्तावरील मंत्री चांडकनगर येथे राहणाऱ्या निकिता श्रीनिवास मोरे या तेवीस वर्षाच्या तरुणीने पती श्रीनिवास मोरे, सासरे अमर मोरे आणि सासू सुवर्णा मोरे यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ११ डिसेंबर २०१९ ते १३ जून २०२१ पर्यंत पती व सासू-सासरे यांनी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. तसेच लग्नामध्ये मानपान नीट झालेला नाही व सोने ही कमी घातले आहे, असे कारण सांगून मानसिक व शारीरिक छळ केल्याचे निकिता मोरे फिर्यादीत म्हटले आहे. बार्शी रोडवरील आकाश नगर येथील घरांमध्ये सासरच्या मंडळींकडून छळ झाल्याचे निकिता मोरे येणे फिर्यादीत म्हटले आहे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पटेल अधिक तपास करीत आहेत.