उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समिती सभापती अविश्वास ठरावाच्यावेळी शिवीगाळ व राडा. उत्तर सोलापूर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव २२ ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी निकम साहेब व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यासमोर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सकाळी ११ वाजता पंचायत समितीचे माजी सभापती संध्याराणी इंद्रजीत पवार, उपसभापती जितेंद्र शीलवंत व सदस्य हरिभाऊ शिंदे तसेच विद्यमान सभापती रजनी भडकुंबे उपस्थित होत्या.
ऑफिसमध्ये मीटिंग चालू असताना रजनी भडकुंबे यांचे वडील संभाजी भडकुंबे व त्यांच्यासोबत आलेल्या गुंडांनी अविश्वास ठराव मंजूर होताच त्यांनी हुज्जत घालून शिवीगाळ व भांडणाला सुरुवात केली यावेळेस अभिजीत भडकुंबे, विकास बनसोडे, शशी गायकवाड व आणलेले गुंड पंचायत समिती आवारात सर्व पंचायत समितीचे सदस्य यांना शिव्यागाळी सुरुवात केली व जीवे मारण्याची धमकी दिली.