येस न्युज मराठी नेटवर्क : भारत सरकारने चीनला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. सरकारने तब्बल 54 चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. जाणून घ्या कोणते आहेत ते अॅप्स..
भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे कारण देत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. बंदी घातलेल्या 54 अॅप्सच्या यादीतील Tencent, Alibaba आणि NetEase शी संबंधित आहेत. 2020 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सपैकी बहुतेक अॅप्स “”रीब्रांडेड तसेच रीक्रिस्टेड” होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
हे अॅप्स भारतीयांचा संवेदनशील डेटा चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर ट्रान्सफर करत होते. आयटी मंत्रालयाने गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप्लिकेशन ब्लॉक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अधिका-याने सांगितले की, “54 अॅप्स आधीच भारतात प्लेस्टोअरद्वारे ऍक्सेस करण्यापासून ब्लॉक करण्यात आले आहेत.” माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे.