येस न्युज मराठी नेटवर्क । पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य चिंतीत आहेत. तर भाजपच्या एका खासदाराने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. भाजपचे खासदार महेंद्रसिंग सोलंकी यांनी म्हटलं की, जर पेट्रोलचे दर वाढत असतील तर त्याच प्रमाणात लोकांचे उत्पन्नही वाढले आहे. इतकेच नव्हे तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीचं खापर सोलंकी यांनी 55 वर्षांच्या कॉंग्रेसच्या राजवटीवर फोडलं आहे.
भाजप खासदार सोलंकी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले आहे, त्याच प्रमाणात लोकांचे उत्पन्नही वाढले आहे. एकट्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. या देशाचे दुर्दैव हे आहे की 55 वर्ष येथे कॉंग्रेस सरकारने राज्य केले. त्यांनी येथे अशी कोणतीही पायाभूत सुविधा निर्माण केलेली नाहीत, ज्यामुळे या किंमती वाढण्यास प्रतिबंध होईल. परंतु नरेंद्र मोदी यांचे सरकार या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.