No Result
View All Result
- केगाव-हत्तुर बाह्य वळण मार्गावरील देशमुख वस्ती परिसरातील त्या उड्डाणपुलावर भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रणात राहण्यासाठी स्पीडगन लावा. तसेच, पुलाच्या कठड्याची उंची वाढवण्यासह त्यावर संरक्षक जाळी बसवण्याच्या सूचना वन्यजीव विभागाच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिल्या असून 15 दिवसांमध्ये उपाययोजनांची पूर्तता करण्यास सांगितले आहे.
- बाह्यवळण मार्गावरील देशमुख वस्ती येथील उड्डाणपुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने 14 काळविटांचा त्यावरून पडून 28 जानेवारीला मृत्यू झाला होता. त्या अपघाताची दखल केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने घेतली. वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन (मुंबई), वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक तुषार चव्हाण (पुणे), उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक दिलीप वाकचौरे यांच्या पथकाने 12 फेब्रुवारीला त्या अपघातस्थळी भेट दिली. रस्त्यांची उभारणी करताना वन विभागाने सुचविलेल्या उपाय योजनांप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या कामांची पाहणी करून केंद्र शासनाकडे अहवाल सादर केला आहे.
- देशमुखवस्ती जवळील परिसरात उंचावर असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन्ही बाजूंनी सर्व्हिस-रोड ठेवून भुयारी महामार्ग केला आहे. त्या भागात काळविटांचा मोठा वावर आहे. त्या बाह्य वळण रस्त्यावर वन्यप्राण्यांना येजा करण्यासाठी तीन ठिकाणी बोगदे केलेत. पण, त्याचा आकार मोठा असल्याने त्यातून थेट छोट्या गाड्यांसह, नागरिकांची वर्दळ सुरुय. रस्त्यामुळे नैसर्गिक जलस्रोताचा प्रवाह थांबल्याने पाण्यासाठी वन्यजीव महामार्गावर येत असल्याच्या नोंदी वन्यजीव विभागाने अहवाल नमूद केल्या आहेत. सोलापुरातील वन्यजीव प्रेमी त्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केली होती.
- परिसरात वाहनांचा वेग जास्त असल्याने स्पीडगन आवश्यक आहे. दंडात्मक कारवाईमुळे चालक सतर्क होतील.
- भुयारी मार्गाची रुंदी कमी केल्यास लोकांचा वापर बंद झाल्यास वन्यप्राणी त्याचा वापर करतील.
- दुर्घटना घडलेल्या रस्त्याच्या संरक्षक कठड्याची उंची वाढवून त्यावर संरक्षक जाळी बसविणे.
- वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी त्या परिसरात वन्य-प्राण्यांचा वावर असल्याचे सचित्र फलक लावणे
- पुणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण म्हणाले की, त्या उड्डाणपुलावरून पडून 14 काळविटांचा मृ्त्यूपूर्वीही दोन दुर्घटना घडल्या होत्या. त्या ठिकाणी आढळलेल्या सर्व गोष्टीसह, आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे सादर केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास येत्या 15 दिवसांमध्ये नव्याने सुचविलेल्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
No Result
View All Result