नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अंतरिम जामीन मिळण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अर्जावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या सुनावणीवेळी सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणातील भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणी ९ मे रोजी पुढील सुनावणी होऊ शकते.
दरम्यान, दिल्ली न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ केली आहे. तर दुसरीकडे, दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणात मनीष सिसोदिया यांच्याही न्यायालयीन कोठडीत १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.