सोलापूर : परमपूज्य सद्गुरु शिवशरणम्मा माऊली कैवल्यधाम मठाचे 41व्या वर्धापन दिना निमित्त दि19/01/21 ते 25/01/21 पर्यंत अखंड वीणा नाम सप्ताह आयोजित करण्यात आले होते. या सप्ताह मध्ये पहाटे काकडा सकाळी प्रवचन व शिवलीलामृत ग्रंथ पारायण व दुपारी 4 ते 7 महिला भजन सायं 7 ते 10 पर्यंत पुरुष भजन कार्यक्रम भक्ती भावत व नामघोषात संपन्न झाले.दि 25/01/21 रोजी सप्ताह शेवटी ह.भ.प. पुरुषोत्तम कुमठेकर यांना अध्यात्म सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल परमपूज्य सद्गुरु शिवशरणम्मा माऊली यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आले तसेच ह.भ.प गोविंद लोंढे महाराज यांना अखिल भाविक वारकरी संघटना भजन समिती जिल्हा अध्यक्ष पद मिळाल्याबद्दल भजनसम्राट ह.भ.प सिद्धेश्वर बुवा कोळी यांच्या शुभ हस्ते सत्कार संपन्न झाले.तसेच संभाजी पवार व माऊली क्षीरसागर कैवल्यधाम मठात अखंड सेवा करत असल्यामुळे परमपूज्य सद्गुरु शिवशरणम्मा माऊली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यक्रामाच्या शेवटी ह.भ.प. पुरुषोत्तम कुमठेकर महाराज यांनी आभार व्यक्त करताना म्हणाले कैवल्यधाम मठात गेल्या 40 वर्षापासून सेवा सुरु असून अजून असेच सेवा या पुढेही घडो व परमपूज्य सद्गुरु शिवशरणम्मा माऊली यांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे आमचे जीवन धन्य झाले असें म्हणून सर्वांचे आभार मानले.