येस न्युज मराठी नेटवर्क । पंजाब नॅशनल बँकेतील १४ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. नीरव मोदी याने भारतातील न्यायालयात खटल्याला सामोरे जावे असे हे प्रकरण असून, त्याच्याविरुद्ध तेथे निष्पक्ष सुनावणी होणार नाही हे सिद्ध करणारा कुठलाही पुरावा नाही, असा निर्णय ब्रिटनमधील एका न्यायालयाने गुरुवारी दिला. यामुळे नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईमधील आर्थर रोड जेलमध्ये त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नीरव मोदीसाठी आर्थर रोड जेलमध्ये विशेष कोठडी असणार आहे.