२७ ऑक्टोबरपासून पुण्यातून होणार सुरुवात; ८ नोव्हेंबर रोजी मुंबईत अस्थिकलश यात्रेचा होणार समारोप
सोलापूर : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले.बारापेक्षा अधिक शेतकरी भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन जबर जखमी झाले.शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात या अत्यंत काळ्याकुट्ट घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात आजवर शहीद झालेल्या 631 शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी विविध संघटनांकडून व महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शहीद किसान अस्थिकलश यात्रेची सुरुवात 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पुरोगामी महाराष्ट्राला सत्यशोधनाचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा फुले वाडा (समता भूमी )पुणे येथून करण्यात आली.तदनंतर हमाल भवन येथे अभिवादन सभा पार पडली.
यावेळी व्यासपीठावर डॉ.अशोक ढवळे, डॉ.अजित नवले,प्रा.अजित अभ्यंकर, मेधा पाटकर, उल्का महाजन,विद्या चव्हाण,विश्वास उटगी,प्रतिभा शिंदे,किशोर ढमाले,नामदेव गावडे, सुभाष काकूस्ते, मानव कांबळे विलास किरोते,सुभाष वारे आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय किसान सभेचा यात्रा कार्यक्रम
महाराष्ट्रातील विविध संघटना दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पुणे येथील महात्मा फुले वाडा येथून यात्रा सुरू करत आहेत. या यात्रा राज्यभर विविध मार्गाने फिरून जनजागरण करतील. महाराष्ट्रभर फिरून या शहीद किसान कलश यात्रा दिनांक 18 नोव्हेंबर रोजी मुंबईत येतील व हुतात्मा चौक, मुंबई येथे यात्रांचा समारोप होईल. सुरुवात व समारोप एकत्र होईल अशी माहिती ज्येष्ठ पुरोगामी,मार्क्सवादी विचारवंत प्रा.अजित अभ्यंकर यांनी दिली.
अखिल भारतीय किसान सभेच्या यात्रेचा मार्ग खालीलप्रमाणे राहील.
या यात्रेत डॉ. अशोक ढवळे,जे.पी.गावीत,किसन गुजर,अर्जुन आडे,उमेश देशमुख
डॉ. अजित नवले आदी शेतकरी नेते यांचा सहभाग असेल.
यावेळी अभिवादन सभेत सोलापूर येथून माकप चे जिल्हा सचिव ऍड.एम.एच.शेख, किसान सभेचे राष्ट्रीय नेते सिद्धपा कलशेट्टी, महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा नसीमा शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला,शकुंतला पानिभाते, सिटू चे राज्य सचिव युसूफ मेजर,सलीम मुल्ला,दीपक निकंबे, बापू साबळे युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव अनिल वासम,सहसचिव दत्ता चव्हाण विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव,जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी झाले होते.
यात्रेचा मार्ग
२७ ऑक्टोबर – पुण्याहून सुरुवात
२८ ऑक्टोबर – सातारा
२९ ऑक्टोबर – कोल्हापूर
३० ऑक्टोबर – सांगली
३१ ऑक्टोबर – सोलापूर
१ नोव्हेंबर – उस्मानाबाद/लातूर
२ नोव्हेंबर – बीड
३ नोव्हेंबर – औरंगाबाद
७ नोव्हेंबर – जालना
८ नोव्हेंबर – परभणी/हिंगोली
९ नोव्हेंबर – नांदेड
१० नोव्हेंबर – यवतमाळ
११ नोव्हेंबर – वर्धा/नागपूर
१२ नोव्हेंबर – अमरावती
१३ नोव्हेंबर – बुलडाणा
१४ नोव्हेंबर – नंदुरबार/धुळे
१५ नोव्हेंबर – नाशिक
१६ नोव्हेंबर – अहमदनगर
१७ नोव्हेंबर – ठाणे/पालघर
१८ नोव्हेंबर – मुंबईत समारोप