येस न्युज मराठी नेटवर्क ; मध्यप्रदेशातील इंदूर शहरातील सावरिया नगर येथे राहणाऱ्या संतोष भागीरथ खालोटिया या तरुणाला मद्य पिऊन वेगाने ऍम्ब्युलन्स चालविल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २७ एप्रिल रोजी संतोष खालोटीया चौकातून वेगाने एम्ब्युलन्स नेताना आढळून आला. या एम्ब्युलन्स चाn पाठलाग करून जुना पुना नाक्याजवळ ॲम्बेसिडर हॉटेल समोर पोलिसांनी ambulance थांबवली संतोष याची सिव्हिल रुग्णालयात तपासणी केली असता त्याने मद्य घेतल्याचे आढळून आले. वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर कुलकर्णी यांनी ही कामगिरी केली आहे. मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार संतोष खारवड्या याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.