सोलापूर – इसम नामे, आरिफ अहमद शेख (वय ४३, रा. १०२/०२, पाच कंदील चौक, मोदी मस्जिदजवळ, सोलापूर) याला पोलिसांनी दोन वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यातून तडीपार केले आहे. याचेविरुध्द सन २०२०,२०२१, आणि २०२३ या कालावधीत अनेक नागरिकांना आर्थिकदृष्ट्या फसवणे, धमकावणे आणि दमदाटी करुन दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.१७५१/२०२५ दि.१४/०७/२०२५ अन्वये, इसम नामे, आरीफ अहमद शेख, वय ४३ वर्षे, रा. १०२/०२, पाच कंदील चौक, मोदी मस्जिदजवळ, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर विजयपुर, कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे.