रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह बरीच नावे चर्चेत होती. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून विद्या चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार श्रीमती विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. डॉ. फौजिया खान यांनी आज विद्या चव्हाण यांना नियुक्ती पत्र दिले. महिला संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी विद्या चव्हाण जोमाने काम करतील, असा विश्वास फौजिया खान यांनी व्यक्त केला.