सोलापूर दि.२१ (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता २४८- सोलापूर शहर उत्तर, २४९- सोलापूर शहर मध्य, २५०-अक्कलकोट आणि २५१- दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून मीना तेजराम श्रीमनलाल (भा.रा.से.) यांची खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
खर्च निवडणूक निरीक्षक मीना तेजराम श्रीमनलाल (भा.रा.से.) यांचे कार्यालय शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने कोणालाही भेटायचे किंवा कोणतीही माहिती दयावयाची असल्यास सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा. तसेच त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९११५२५२५९४ हा असून त्यांचेशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधता येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.