सिईओ स्वामी यांनी केले स्वागत
सोलापूर – पाणी व स्वच्छता विभागाच्या जल जीवन मिशन च्या प्रकल्प संचालक पदी अमोल जाधव यांची नियु्क्ती ग्रामविकास विभागाने केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना भेटून प्रकल्प संचालक अमोल जाधव हे रूजू झाले आहेत. जिल्हा परिषदेचे वतीने सिईओ दिलीप स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी देखील त्यांचे स्वागत केले. अमोल जाधव हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते. तेथून त्यांची बदली सोलापूर येथे झाली आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब येथील रहिवासी असलेले जाधव यांनी कर्जत तालुक्यात उत्कृष्ट काम केले आहे. घरकुल, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जल जीवन मिशन, माझी वसुंधरा अभियानात मिरजगाव ग्रामपंचायतीने राज्यात दोन वेळा विजेतेपद पटकाविले आहे.
या प्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता.मिशन कक्षाच्या वतीने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वागत केले. या प्रसंगी लेखाधिकारी मिरगाळे, अधिक्षक सचिन सोनकांबळे, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार यशवंती धत्तुरे, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, घनकचरा सल्लागार मुकूंद आकुडे, सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे, सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार प्रतिक्षा गोडसे, डाटा एन्ट्री आॅपरेटर अल्फिया बिराजदार उपस्थित होते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वतीने कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, अधिक्षक अविनाश गोडसे, यांचेसह स्टाफ