सोलापूर – महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. महाडीबीटी पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार अर्ज केलेल्या घटकांची सोडत दर आठवड्याला काढण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडत दिनांक 15 मे 2023 पर्यंत तसेच दिनाक 15 मे 2023 नंतर दोन ते तीन महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश माहिती अज्ञाताकडून विविध सामाज माध्यमांवर प्रसारित केली जात आहे. महाडीबीटी पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी
\कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in शेतकरी य़ोजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहनही कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.