सोलापूर : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम मुर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती मध्ये व साधू संत यांच्या हस्ते केली जात आहे. हा क्षण ऐतिहासीक असून अविस्मरणीय आहे . समाजातील प्रत्येक घटकाला जीवन जगताना योग्य दिशा देणारे चरित्र म्हणजे रामचरित्र – रामायण आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एकमेव आधार म्हणजे रामायण आहे. मनुष्य जिवन जगताना आदर्श व मर्यादावत जगता यावे त्यासाठी एकमेव ग्रंथ फक्त रामायण आहे . त्या आदर्श , मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामची मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून सोलापूर जिल्हा व शहरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत . हा दिवस दिवाळी सणा प्रमाणे साजरा करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्याचे परम भाग्य आम्हाला लाभत आहे. असे ही मत व्यक्त करण्यात आले. सर्व महिला मंडळ व दिंडी प्रमुखांना आवाहन करुन 22 ता. हा दिवस दिवाळी प्रमाणे साजरा करण्यात यावा . त्या दिवशी भजन , कीर्तन, प्रवचन, कथा , भारुड, ई. कार्यक्रम केले जावेत असे प्रयत्न मंडळाकडून करण्यात येत आहेत. शहरामध्ये प्रत्येक वॉर्डात म्हणजे 100 व ग्रामीण भागात 100 ठिकाणी असे कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली. यासाठी जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), बळिराम जांभळे (राष्ट्रिय सचिव), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), मोहन शेळके (प्रदेश सचिव), बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष), माऊली भगरे (जिल्हा अध्यक्ष – पंढरपूर ), संजय पवार (शहर अध्यक्ष), कुमार गायकवाड, सचिन गायकवाड, महेश चोरमुले, दत्तात्रय भोसले महाराज , ई.शहर व जिल्हा पदाधिकारी परिश्रम घेत आहेत .