दिल्ली : दिल्लीच्या खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास दोन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले. काही जण खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत, अशी तक्रार मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. या प्रकरणात पोलिसांकडून दोन पुरुष, तीन महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.तपास अधिकारी तिथे पोहोचला, त्यावेळी दोन पुरुष, तीन महिला बाईकवर बसले होते. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर आम्ही इंडिया गेट परिसर पाहण्यासाठी आलो आहोत. आम्ही बाईक भाडयावर घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.