IND vs AUS : ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया उद्या मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे दोन खेळाडू कसोटी पदार्पण करणार आहेत. पहिल्या सामन्यात झालेला मानहानीकारक पराभवानंतर हा सामना जिंकण्याचं आव्हान घेऊन अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयनं एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे तर चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत विकेटकीपर असेल तर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं हे कसोटी पदार्पण असणार आहे.