सोलापूर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्या निमित्ताने शिक्षकांचा गौरव होणार असल्याची माहिती संघटनेचे प्रवक्ते अतुल नारकर यांनी दिली.
रविवारी (ता.०५ डिसेंबर) रोजी सकाळी ११.३० वाजता हॉटेल सेंटर पाँईटच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते व माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास संघटनेचे प्रदेश सचिव सुनिल चव्हाण, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे, गुरुनाथ वांगीकर, सचिन चौधरी, मुरलीधर कडलासकर, सोमेश्वर याबाजी, अ.गफुर अरब हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
महात्मा ज्योतीराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे : पुलकेशी संगा (नारायणराव कुचन प्राथ. शाळा), संजीवनी नगरकर (सेवासदन प्राथ. शाळा), शिवाजी कोंडुभैरी (नू.म.वि. मंगळवेढा), रणजित सावंत (बालोद्यान प्राथ.विद्यालय), सचिन लांडगे (सुरवसे हायस्कूल) उल्हास बिराजदार (सरस्वती तिमप्पा प्राथ. शाळा), संतोष भडंगे (नवीन मराठी शाळा, वैराग), ज्ञानेश्वर विजागत (जि.प.प्राथ.शाळा ढोलेवस्ती, रांजणी, पंढरपूर), विष्णु शिंदे (जिजामाता प्रशाला, आंबे, पंढरपूर), शकील मुलाणी (शंकरराव मोहिते प्राथ. विभाग, अकलूज), विजयश्री गायकवाड (राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला, मोहोळ), , स्वरुपा मामड्याल (सिंगम प्राथ. शाळा), सविता गुंडे (चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथ. शाळा), छाया महिंद्रकर (मलप्पा कोनापुरे प्रशाला, आहेरवाडी), सुमैय्या तांबोळी (माणिकबाई डुडु विद्यामंदिर, नातेपुते), आलिया महागामी (बी.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल), अशपाक मणियार (बी.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल), सदाशिव शिंदे (जय मल्हार प्राथ. शाळा), परमेश्वर बाबळसुरे (भू.म.पुल्ली कन्या प्रशाला), जयराज मडोळे (ज्ञानसागर हायस्कूल), संपत नलवडे (जि.प.प्राथ. शाळा आडेकर वस्ती, करमाळा), आरिफ पठाण (बी.के.क्यु. गर्ल्स हायस्कूल), बालाजी गोप (कुचन प्रशाला). शाल, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विनोद आगलावे अनिल गायकवाड, शहाजी रंदवे, संतोष माशाळे, धनाजी मोरे, विशाल काळे समीर शेख यांनी केले आहे.