• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, September 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आईवडिलांचा सन्मान करणारी परंपरा अण्णासाहेब भालशंकर यांनी सुरू केली – माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रतिपादन…

by Yes News Marathi
December 25, 2024
in इतर घडामोडी
0
आईवडिलांचा सन्मान करणारी परंपरा अण्णासाहेब भालशंकर यांनी सुरू केली – माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रतिपादन…
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भालशंकर गौरव समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीचे वाटप,ग्रंथाचे प्रकाशन

सोलापूर, दि. 25- आईवडिलांचा सन्मान करण्याची परंपरा घरोघरी निर्माण झाली पाहिजे. अशी परंपरा समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी गेली २६ वर्ष पूर्वीपासून सुरू केली आहे. अण्णासाहेब भालशंकर त्यांच्या आईवडिलांचा सन्मान करतात, त्यांची मुले त्यांचा सन्मान करतात .अशी सन्मानाची परंपरा राज्य आणि देश पातळीवर सुरू व्हावी. असे प्रतिपादन पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले. नामदेवराव भालशंकर यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त नामदेव (बापू) बंडूजी भालशंकर गौरव समिती, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन आणि सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्ती वाटप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बुद्धजय भालशंकर लिखित ‘ मोहब्बत की ‘किताब’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौरव समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. याप्रसंगी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, मातोश्री रुक्मिणी भालशंकर, गौरव समितीचे सचिव बोधिप्रकाश गायकवाड, , नीलकंठ शिंगे, नानासाहेब भालशंकर, अशोक पाचकुडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपआयुक्त संजयकुमार राठोड म्हणाले की आईवडील आपले पहिले दैवत आहेत.या दैवतांची पूजा करा, आयुष्यभर सुखी, समाधानी राहाल. पुरस्कार देऊन सन्मानित केलेली माणसं खरोखरच सन्मानास पात्र आहेत.

प्राथमिकचे शिक्षण अधिकारी कादर शेख यावेळी बोलताना म्हणाले की भारतीय संविधान हे सर्वव्यापी आहे म्हणून शासनाने देखील ” घर घर संविधान-हर घर संविधान ” ही मोहीम राबविण्यात येत आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर यांनी पुरस्कार वितरण, रुक्मिणी फौंडेशन आयोजित निराधार विद्यार्थी दत्तक निधी, सम्यक अकॅडमी आयोजित स्पर्धा परीक्षा बाबतची संकल्पना विशद केली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर रवी देवकर यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतल्यानंतर

निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव आणि परभणी येथील हुतात्मा सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
तद्नंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून दहा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यानंतर मातोश्री रुक्मणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच गरीब, गरजू निराधार विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण झाल्यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्यावतीने संविधान दिनी आयोजित सविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याच समारंभात राज्य कर निरीक्षक बुद्धजय भालशंकर लिखित भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करणाऱ्या “मोहब्बत की किताब” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तद्नंतर याच पुस्तकावर आधारित बुद्धजय भालशंकर लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या मोहब्बत की किताब लघु नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. या नाटिकेत स्वतः बुद्धजय भालशंकर तसेच मोनाली भालशंकर -मेश्राम यांची प्रमुख भूमिका होती.

यांचा झाला सन्मान..

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार शशिकांत सदानंद जाधव-अध्यक्ष, ॲन्टॉप हिल मुंबई, भगवान गौतम बुध्द जीवनगौरव पुरस्कार अंबादास रामचंद्र कदम- सोलापूर, माता रमाई भिमराव आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जयसाबाई अजीनाथ हांडे, मु. पो. तांबोळे ता, कर्मवीर भाऊराव पाटील जीवनगौरव पुरस्कार युवराज भगवान सांगळे – , चुंब ता. बार्शी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार शरीफ चाँदसाब सय्यद- उपसंपादक- दैनिक पुण्यनगरी सोलापूर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत युवती उद्योजिका पुरस्कार वृषाली महादेव भुरले – यंत्र कारागिर सोलापूर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवंत युवा उद्योजक पुरस्कार अमोल सुरेश शिंदे (मालक- अथर्व प्लास्टिक सोलापूर), महात्मा जोतीबा फुले गुणवंत कामगार सेवक पुरस्कार बापूसाहेब रामलिंग सदाफुले सोलापूर,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रतिभा जोतीराम पांडव- सहशिक्षिका, मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव, ता.माढा, जि.सोलापूर या सत्कारमुर्तीचा सपत्नीक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, वृक्षाचे रोपटे देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याच समारंभात मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन सोलापूर या ट्रस्टच्यावतीने जिल्हयातील अनाथ, निराधार, गरजु ,हुशार विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा (एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी) देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले.

या समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन राज्य कर निरीक्षक बुद्धजय भालशंकर व युवराज भोसले यांनी केले तर अशोक पाचकुडवे यांनी आभार मानले.

हा समारंभ यशस्वी करण्यासाठी मिलिंद भालशंकर, दाऊद आतार, प्रफुल्ल जानराव, प्रकाश साळवे, , नितीन गायकवाड,दाऊत आतार, सिद्धेश्वर भुरले, सुशीलचंद्रभालशंकर ,माधव माने, विजयकुमार लोंढे,शिवाजी जगताप, डॉ. राजदत्त रासोलगीकर, महादेव कांबळे, सत्यवान पाचकुडवे, , विष्णू लादे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

सहस्त्रार्जुन प्रशालेत क्रीडा महोत्सवाची जोरदार सुरुवात… श्रावणी सूर्यवंशी च्या हस्ते झाले उदघाटन

Next Post

सोलापूर विद्यापीठाचा एप्रेटीसशिप व रोजगारासाठी शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग’शी करार!

Next Post
सोलापूर विद्यापीठाचा एप्रेटीसशिप व रोजगारासाठी शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग’शी करार!

सोलापूर विद्यापीठाचा एप्रेटीसशिप व रोजगारासाठी शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या 'बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग'शी करार!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group